कांद्याचे पापड
साहित्य:१ किलोकांदा,पाव किलोसाबुदाणा,लाल तिखट चवीनुसार,मीठ चवीनुसार,तीळ ४/५ चमचे.
कृति:साबुदाणा रात्री भिजत घालावा. कांदा किसून घ्यावा. गॅसवर पाणी उकळतं ठेवून त्यात किसलेला कांदा ,साबुदाणा तिखट ,मीठ ,तीळ ,टाकून थोड घट्ट होई पर्यंत उकळावं. कांदा आणि साबुदाणा शिजत आलं कि गॅस वरून काडून गरम गरम मिश्रण उन्हात एक पळीने प्लास्टिकच्या कागदावर वाळवत टाकावं. उन्हात ४/५ दिवस वाळवावे. ४ ते ५दिवसांनी आपले पापड तळून खायला तयार.

Comments
Post a Comment