माझा मराठी पदार्थ वासावन चा सार


साहीत्य: (४  ते  ५  माणसांकरता )तांदूळ-१ वाटी, तूरडाळ-१/२ वाटी,कैरी,कोथम्बीर,४ ते ५ लसूणच्या पाकळ्या,जिर,मोहरी,हळद,धणे पावडर, हिरवी मिरची ४ ते ५,आलं,मीठ









                                                                                                                                                                      

  कृति:प्रथम तांदूळ बाहेर भांड्यात शिजवावे.साधारणपणे तांदूळ शिजवताना आपण १ वाटी ला २ वाटी पाणी टाकतो पण आपल्याला भाताच्या वरील पाण्याचं सार करायचं त्यामुळं आपण १ वाटी तांदूळकरता ३ ते ४ वाटी पाणी टाकून शिजवून घ्यावा. तांदूळ शिजत आले की त्याचावरील पाणी जितक पाहिजे तितक काढून घ्याव. तूरडाळ कुकर मधे शिजवून घ्यावी व त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यावी. ईकडे मिक्सर मधे कैरी, लसून,आलं,हिरवी मिरची, जिर,आणि आल्याची पेस्ट करून घ्यावी. शिजवलेल्या तांदलावरील पाणी काढून घ्यावे त्यात शिजवलेली तूर डाळ एकत्र करून त्याचात आपण केलेली  आलं लसूण केंरी ची पेस्ट टाकावी|.नंतर तेल गरम करून त्याच्यात मोहरी,जिर,धने पावडर,हळद,ची फोडणी द्यावी. ही फोडणी आपण केलेल्या सार मधे टाकून सार चांगला उकडू घ्यावा व त्यात चावीनुसार मीठ टाकाव. त्याच्यावर भरपूर कोथम्बीर टाकून गरम गरम भातासोबत खायला घेणे.



  



Comments

Post a Comment